Forventes på lager: 26-11-2019
मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२००९), ‘स्लॉगन्स गिफ’(२०१४), ‘डामा ऑग बॉडेल’(२०१५), ‘ब्लॉडरेगन’(२०१६), आणि ‘द क्लिनर’(२०१९) ही त्यापैकी काही.
| Forlag | SAGA Egmont |
| Forfatter | – इंगर गैमलगार्ड मैडसन |
| Type | Ebog |
| Format | epub |
| Sprog | Marathi |
| Udgivelsesdato | 26-11-2019 |
| Udgiver | SAGA Egmont |
| Oversætter | Saga Egmont |
| Sideantal | 175 Sider |
| Filtype | epub |
| Filversion | 2.0 |
| Filformat | Reflowable |
| Filstørrelse | 1626 KB |
| Kopibeskyttelse | DigitalVandmaerkning |
| Datamining | Ikke tilladt |
| ISBN-13 / EAN-13 | 9788726232097 |